About Me

My photo
मी एक शिक्षक असून कीर्तन करणे आणि संतविचार समाजात रुजविणे हा माझा प्रयत्न. कथाकथन करण्याची आवड असून लिखाणाची आवड आहे.

Sunday, October 6, 2019

माझ्याविषयी

             मी एक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक. तसा साहित्याची आवड असलेलाच मी, अगदी बालपणापासून नाटक पाहणे,सिनेमा पाहून जसाच्या तसा इतरांना कथन करणे या माझ्या घडामोडी असायच्या. अगदी पाचवीमध्ये शिकत असतांना स्वतःच चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावरून राजा शिवछत्रपती हे अगदी तीन तास चालणार नाटक मी स्वतःच लिहून माझ्या वर्गमित्रांच्या सहाय्याने आमच्या गावात यशस्वी प्रयोग सादर केला होता याचं मला आजही नवलच वाटत.
     आता सध्या कीर्तन करून संत विचाराच्या आधारे समाजप्रबोधन करणे  आणि अनिष्ट बाबींना  आळा  घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. आणखी माझा आवडता छंद म्हणजे कथाकथन करणे आहे, कोणतीतरी एखादे कथानक बनवून त्यावर आधारित कथा सांगायला मला फार आवडते परंतु तसा योग दुर्मिळच . साने गुरुजी कथामालेच माध्यमातून जिल्हास्तर आणि विभागस्तरावर कथाकथन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. शिक्षकांच्या साहित्य संमेलनात मिळालेल्या संधीचे सोने करतांना मी कसून प्रयत्न केला आणि तसा तो यशस्वी सुद्धा झाला.
          या सगळ्या गोष्टीपेंक्षा माझा आवडता विषय म्हणजे "माझा विद्यार्थी-माझे दैवत" आणि म्हणून  नवनवीन उपक्रम करण्याची माझी धडपड सतत सुरूच राहते,यातून मला उपक्रमशील शिक्षक म्हणतात हा माझ्यासाठी आनंददायीच म्हणावं लागेल.  आता ब्लॉगवर  इथून पुढे काही तरी टायपून ठेवण्याचा प्रयत्न करीन म्हणतोय..... बघूया किती यशस्वी होता येईल ते..... शेवटी सखा भगवंत ..कृपा त्याची...!  

No comments:

Post a Comment

शिव संवाद.- फेसबुक वरील लाईव्ह कार्यक्रम 'मन करा रे प्रसन्न'

https://m.facebook.com/story.php?story_fbid=177296593607156&id=100977544953592