About Me
- झगरे ज्ञानेश्वर
- मी एक शिक्षक असून कीर्तन करणे आणि संतविचार समाजात रुजविणे हा माझा प्रयत्न. कथाकथन करण्याची आवड असून लिखाणाची आवड आहे.
Thursday, May 21, 2020
Thursday, January 9, 2020
पालकांसाठी ...आवर्जून... (शिक्षण मित्र मासिकात प्रकाशित डिसेंबर18)
'पालक' म्हणजे कुटुंबांचा मूलाधार आसतो. जसा पालक अगदी तसेच किंबहुना त्याचेच प्रतिबिंब कुटुंबात बघायला मिळते. पालकांच्या संकल्पनेत येणाऱ्या आई, वडील,आजी,आजोबा, काका, काकू आणि इतर पालकांनी आवर्जून आपल्या पाल्याच्या जडणघडणीसाठी काही बाबींचा विचार करणे गरजेचे असते.
लहान मुल म्हणजे प्रत्येक पालकाचं एक स्वप्न.. आणि अशा या स्वप्नाला आकार देणं हे सुद्धा पालकाचे कर्तव्यच. या कर्तव्याची पूर्तता करतांना कांही बाबी आवर्जून लक्षात ठेऊन मार्गक्रमण करावं या उद्देशाने हा लेखन प्रपंच.

''मूल म्हणजे जणू आरसाच आहे. पालकांचे स्वतःचे प्रतिबिंब त्यात दिसणार आहे'. 'सुशिलों मातृपुण्येन,पितृपुण्येन चतुतता।।' या सुभाषिता प्रमाणे.. आईच्या संस्कारातून सुशीलता तर वडिलांच्या संस्कारातून चतुरता प्राप्त होते असे मानतात. मूल आपले आहे. त्याचा स्वभाव, आवडनिवड इत्यादी गोष्टींचा विचार करताना असे वाटते की, पालकाने स्वतः दिवसभर काय काय आणि कसे कसे केले? याचा विचार करावा तसेच प्रत्येक कृतीमध्ये, बोलण्यात, वागण्यात योग्य-अयोग्य काय याचा स्वतःच विचार करावा.आपल्या वागण्या-बोलण्यातून मुलांवर चांगले संस्कार झाले का? आपण वडीलमाणसांशी आदराने वागलो का? माझ्यात काही बदल करणे गरजेचे आहे का? इत्यादी गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे.मुलांचे पालक होणे फार सोपे आहे; पण जबाबदार पालक होणे जरा कठीणच...! जबाबदार पालक हा प्रथम प्रेमळ पालक असतो. मारण्यासाठी उगारलेला हात मुलांच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतो; पण प्रेमाने पाठीवर फिरवलेला हात मनाला उभारी देतो. मुलांचे नैसर्गिक फुलणे हे पालकांच्या प्रेमळपणाशी निगडित आहे. प्रेमळपणाबरोबरच पालक हा डॉक्टरही असतो, शिक्षकही असतो, बालमानसतज्ज्ञही असतो, तसाच मुलांचा मित्रही असतो. असे झाले तर मुलांचे बालपण हरवणार नाही आणि पालकांना पालकत्वाचा आनंदही अनुभवता येईल हे नक्की.“आपल्यावर प्रेम केलं जातंय, आपण एका कुटुंबाचा भाग आहोत, आपणही काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो आणि आपल्या जिज्ञासेला मोठ्यांकडून प्रोत्साहन दिलं जातं असं तुमच्या मुलाला वाटण्याजोगं वातावरण तयार करण्यात जर तुम्हाला यश आलं, तर मुलांच्या मेंदूचा योग्य विकास आपोआप होईल,” असे हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. पीटर गोर्स्की म्हणतात.
मुले नेहमीच पालकांचे अनुकरण करत असतात. पालक मुलांसाठी एक संदर्भ बिन्दू असतात. जेव्हा मुले कुठल्याही त्रासातून जात असतात तेव्हा, पालकांकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतात. मुले त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून पालकांच्या सवयी घेतात. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ते पालकांचे वागणे आणि कृती यांचे अनुकरण करतात. पालक हे मुलांसाठी 'खरे आदर्श ' असतात.
'शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी।।'
या संतोक्ती प्रमाणे स्वतः पालक हेच शुद्ध आणि सद्विचार असणे अपेक्षित आहे, तेव्हा आपण आपल्या पाल्याच्या भावविश्वाचा विचार करतांना स्वतः काही विचार आणि कृती आवर्जून आणि कटाक्षाने पाळूया.. जेणेकरून एक आदर्श आणि सुसंकृत व सुजाण बालक घडविल्याचे समाधान आपल्याला मिळेल.
यासाठी अनेक बाबींपैकी काही खालील बाबींचे पालक म्हणून आवर्जून पालन करुया.

१) पाल्यांसाठी थोडा तरी वेळ राखीव ठेवूया.
२)पाल्यांसोबत गप्पा,गाणी, गोष्टी तसेच खेळ खेळूया.
३)आवर्जून मोबाईल, टीव्ही, संगणक याचा स्वतः अतिवापर टाळून पल्यांसमोर आदर्श ठेवूया.
४)मुद्दाम पाल्यांना समजेल अशा परोपकारी घटनांना नित्याच्या जीवनात स्थान देऊया.
५)वेळेवर झोपणे,उठणे,जेवणे, व्यायाम करणे या क्रियांची जाण स्वतः आचरणातून पाल्यांना करून देऊया.
६)पाल्यांना फक्त घेण्याचीच सवय न लावता देण्याचीही सवय लावूया.
७)अभ्यासाबरोबर संस्कार म्हणजे शिक्षण व संस्कार यांची सांगड आपल्या पाल्याच्या जीवनात कशी निर्माण करता येईल याचा सतत विचार करुया.
८)आपली पाल्य प्रामाणिक, कृतज्ञ, सेवाभावी राहतील याचा प्रयत्न करूया.
९)इतरांना सभ्यपणे बोलणे, समाजात मिसळून समाज सेवा करण्याची वृत्ती त्याच्या अंगी बाळगेल याचा विचार करूया.
१०)मी माझे सोडून 'हे विश्वची माझे घर' अशी वैश्विक एकतेची बीजे पाल्यांमध्ये जाणीवपूर्वक रुजवूया..

लेख-श्री ज्ञानेश्वर गणपत झगरे
(स.शिक्षक) जि. प. प्रा. शा. उमरखेडा,
ता-भोकरदन, जि-जालना
मो नं 9923528494
(स.शिक्षक) जि. प. प्रा. शा. उमरखेडा,
ता-भोकरदन, जि-जालना
मो नं 9923528494
Subscribe to:
Comments (Atom)
शिव संवाद.- फेसबुक वरील लाईव्ह कार्यक्रम 'मन करा रे प्रसन्न'
https://m.facebook.com/story.php?story_fbid=177296593607156&id=100977544953592